Crocodile Viral Video In Mumbai: मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात असलेल्या महात्मा गांधी स्विमिंग पूल (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool) येथील कर्मचाऱ्याला मगरीने चावा घेतला आहे. या प्रकारामुळे जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेले नागरिक आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच एका कर्मचाऱ्यांने मगरीला पकडले आणि एका पिंपात स्थानबद्ध केले. स्विमींग पुलापासून काही अंतरावरच एक प्राणीसंग्रहालय आहे. त्यातूनच ही मगर येथे आली असावी, असा संशय व्यक्त केला जातो आहे. या मगरिचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मगरीने अधिक लोकांना चावण्यापूर्वी आणि इतर कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी जलतरण तलाव देखभाल कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवले. त्याने मगरिला स्थानबद्ध केल्याने संभाव्य धोका टळला असला तरी भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान, मगर सापडल्याची माहिती पालिका प्रशासन, वन विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आदींना कळविण्यात आली. घडल्या प्रकाराबाबत माहिती देताना जलतरण तलावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरातच एक प्राणीसंग्रहालय आहे. त्यातूनच ही मगर येथे आली असण्याची शक्यता आहे. या प्राणी संग्रहालयातून या आधीही, साप, अजगर असे अनेक जीव बाहेर पडले होते. ज्यामुळे परिसरामध्ये घबराट पसरली होती.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार बंद करावेत. तातडीने या प्रकरणी कारवाई करावी. परिसरात चालवले जाणारे प्राणीसंग्रहालय हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. इतकेच नव्हे तर ही मगर एखाद्याला चावली अथवा इतर काही अनर्थ घडला तर ते नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. पण, एखाद्या नागरिकाच्या संतापामुळे मगरीवरही हल्ला होऊ शकतो. ज्यात एका मुक्या प्राण्याचा जीव विनाकारण जाऊ शकतो, अशी टीका आणि मागणीही मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
'X' व्हिडिओ
Watch | 2 feet long crocodile found inside BMC Shivaji Park Swimming Pool, Dadar 👇#Dadar #Mumbai #BMC #MumbaiNews #Crocodile @mybmc @PublicDadar pic.twitter.com/OlFCyhkvhw
— Free Press Journal (@fpjindia) October 3, 2023
मग हा जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारा भूजलचर प्राणी आहे. त्यामुळे तो पाण्यात शिकारीसाठी किंवा बचावासाठी जसा इतरावर हल्ला करु शकतो तसाच तो जमीनीवर येऊन मानवावरही हल्ला करु शकतो. त्यामुळे या प्राण्याला सर्वजन टरकून असतात.