
राज्यात शिवसेना नेत्या सुष्मा अंधारे विरुध्द वारकरी संप्रदाय हा वाद सध्या शिगेला पेटला आहे. रोज या वादावर आरोप प्रत्यारोपाची मालिकाचं बघायला मिळते. आज तर वारकरी संप्रदायावर निशाणा साधत सुष्मा अंधारेंनी थेट सरसंघचालक मोहन भागवतांवरचं टीका केली आहे. माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे खरे वारकरी नाहीत तर ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, कीर्तनकार, प्रहसनकार आहेत. माझ्यावर टीका करणारे वारकरी हे पेड कीर्तनकार आहेत. या प्रकारची टीका करत सुष्मा अंधारेंनी थेट मोहन भागवतांवर निशाणा साधत संघाससह भाजपावर हल्लाबोल केला आहे. पंढपूरात पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी हा घणाघात केला आहे. l दरम्यान अंधारे यांनी सरसंघचालकांसह विविध भआजप नेत्यांवर देखील हल्लाबोल केला असुन भाजपचा केवळ शिवसेना संपवण्याचा कट असल्याची टीका सुष्मा अंधारे यांनी केली आहे.
देवेंद्रजींच्या भाषेत मी जर चार महिन्यांचे बाळ असेल आणि चार महिन्यातच त्यांना सळो की पळो करत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. माझ्या क्लिपबाबत चर्चा होते, मात्र सावरकरांनीही तेच लिहून ठेवलं आहे, श्री श्री रविशंकर यांनी देखील हेच लिहलं आहे, मग त्यावर चर्चा का होत नाही. मी शिवसेनेत असल्यामुळे हे सर्व सुरू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. (हे ही वाचा:-अमरावती मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल B S Koshyari यांच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; चप्पल दाखवत निषेध)
दरम्यान सुष्मा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला आहे. सुष्मा अंधारे म्हणाल्या भाजपला पक्ष वाढवायचा आणि थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील हे कळणार नाही, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. देवेंद्र उस बला का नाम है, अशी खोचक टिपणी सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली.