Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI, NIA द्वारे करा, कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
Supreme Court | (File Image)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Case) प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी अशी मागणी विरोधक आणि विविध स्थरांतून केली जात आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) सुशांत सिंह राजपूत ((Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी की नाही याबाबत मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) , अथवा सीबीआय द्वारे करावा अशी मागणी एका विद्यार्थ्याने केली आहे. हा विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेत असून, त्याने सोर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या विद्यार्थ्याबाबत तपशीलवार माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र, एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर आज (4 ऑगस्ट) सुनावणीही झाली. मात्र, मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय कार्यालयं आणि न्यायालय आदींना सुट्टी देण्यात आल्यामुळे या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्य न्यायधीश दिपंकर दत्ता यांच्या खंडपिठापुढे ही या याचिकेवर सुनावणी सुरु होती. समीत ठक्कर यांनी वकील रसपालसिंह रेणू यांच्यामार्फत ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Death Probe: सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली )

दुसऱ्या बाजूला विरोधक आणि सत्ताधारी यांच्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन चांगलेच राजकारण रंगले आहे. यात कमी की काय म्हणून बिहार सरकार आणि बिहार पोलिसांचाही समावेश झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी पक्षांकडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडेच राहील असे सांगण्यात आले आहे. तर, विरोधी पक्ष या प्रकरणात सरकार एका मंत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे करावी अशी मागणी करत आहेत.