कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे (Coronavirus Second Wave) दाहक रुप सध्या देशासह राज्यात अनुभवायला मिळत आहे. मागील वर्षीपासून सुरु झालेल्या या संकटामुळे आर्थिक चक्र देखील डळमळीत झाले आहे. कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग थोपवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंदे, व्यवसाय संकटात सापडले. परिणामी आर्थिक गणित चुकले. ही परिस्थिती अद्याप कायम आहे. यातच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदास सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे सिलेंडरच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिले, "देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प आहेत. यामुळे कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडरचे दर रु. 800 च्या पार पोहोचले आहेत. ही रक्कम परवडत नसल्याने अनेकांचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान कोरोना काळात तरी जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कृपया गॅसच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा."
ANI Tweet:
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प आहेत. अशा परिस्थितीत जनतेची क्रयशक्ती देखील घटली असून अनेक कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे.या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर रु. ८०० च्या पार पोहोचले आहे.अनेकांना ही रक्कम परवडत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.
— Supriya Sule (@supriya_sule) May 6, 2021
अवश्य यावर विचार करुन सर्वसामान्यांना दिलासा द्याल हा विश्वास आहे. धन्यवाद.
— Supriya Sule (@supriya_sule) May 6, 2021
या विनंतीवर विचार करुन गॅस दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना दिलासा द्याल, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कालच्या अपडेटनुसार राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र राज्यातील निर्बंध 15 मे पर्यंत कायम राहणार आहेत.