सुप्रिया सुळे आणि कप्तान मलिक( फोटो: पीटीआय/ ट्विटर)

आरे कॉलनीतील ( Aarey Colony) वृक्षतोडीला संपूर्ण शहरातून विरोध केला जात आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारासह दिग्गज नेत्यांकडूनही विरोध दर्शवला आहे. यातच राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक (Kaptan Malik) यांनी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला समर्थन दिल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यानी मलिक यांच्याकडून राजनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे हजारो झाडे लावण्याचे काम आपण करत आहोत तर, दुसरीकडे काही लोक पर्यावरण नष्ट करण्याचे काम करीत आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राष्ट्रवादीचे (Rashtrawadi Congress Party) नगरसेवक मलिक यांच्याकडून वृक्षतोडीला समर्थन दिल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे.

कप्तान मलिक हे 2007 पासून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आरे कॉलनीतील जंगल नष्ट करुन त्या ठिकाणी मेट्रो कारशेड तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु, नागरिकांनी सरकारच्या या धोरणाला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही नागरिकांना पाठिंबा दिला आहे. यातच कप्तान मलिक वृक्षतोडीला समर्थन देत असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांच्या कानावर पडली. सुप्रिया सुळे यांनी कोणताही विचार न करता कप्तान मलिक यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केली आहे. यासोबत त्यांनी ही भूमिका का घेतली? याचे स्पष्टीकरणही मागितले आहे. हे देखील वाचा-शिवसेना वाहतूक सेनाचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप

"आम्ही पर्यावरणाच्या बाजूने आहोत. मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही विरोध केलेला आहे. सरकार एक गोष्ट सांगते आणि पर्यावरण प्रेमी दुसरी. त्यामुळे नेमका मुद्दा काय आहे, समजून घेण्यासाठी मी इथे आले आहे," असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.