Supriya Sule (Photo Credits-Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज संसदेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे तोंडभरून कौतुक करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitaraman) यांना मोलाचा सल्ला दिला. 'निर्मलाताई अर्थखातं कसं चालवावं यावर अजित पवारांचे मार्गदर्शन घ्या' असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी निर्मला सीतारमण यांना दिला. त्या लोकसभेत बोलत होत्या. खासदारांचे 12 कोटी मोदी सरकारने परस्पर कापल्यावरुन सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी निर्मला सीतारमण यांना मोलाचा सल्ला देत अजित पवारांचे कौतुक केले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायची आहे. केंद्रीय आणि महाराष्ट्र कॅबिनेटच्या अर्थमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. केंद्रीय अर्थमंत्री (निर्मला सीतारमण) यांनी देशातील प्रत्येक खासदाराकडून बारा कोटी रुपये काढून घेतले, तेही त्यांना न विचारता. त्यांनी परस्पर घेऊन टाकले. आता लोक आम्हाला विचारतात, एमपीलॅड फंड द्या, ते तर मोदीजी घेऊन गेले. कुठून देऊ, अडीच वर्ष तर काहीच करता येणार नाही." असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.हेदेखील वाचा- Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या सरकारी विमानास परवानगी नाकारली, बुकींग करुन खासगी विमानाने रवाना

"याच्या अगदी उलट, एकाही आमदाराकडून… चारही पक्षांच्या बरं का, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक आमदाराला, अगदी विरोधीपक्षातीलही आमदारालाही दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतील, हे आमच्या अर्थमंत्र्यांनी सुनिश्चित केलं. हा भारताचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांच्यातील फरक आहे. दोन कोटीही दिले आणि नंतर तीन कोटीही दिले. कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. जीएसटी येत नसतानाही राज्य सरकारकडून चांगली व्यवस्था केली जात आहे." याकडे सुप्रिया सुळेंनी सर्वांचे लक्ष वेधलं.

“मला वाटतं, तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून काहीतरी शिकू शकता. त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घेता येईल. लोकांकडून चांगल्या कल्पना घेणं, ही चांगली गोष्ट असते.” असं सुप्रिया सुळे संसदेत म्हणाल्या.