निवडणूक प्रतिज्ञापत्रकात महिती लपविल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) आज नोटीस पाठविली आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मत मांडण्यासाठी कोर्टाने वेळ दिला आहे.
फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभेच्या निवडणूकीसाठी दिलेला अर्ज खोटा असून त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांची महिती लपविली गेली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी ही माहिती हेतूपूर्वक लपविल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करावी अशी याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे.
Supreme Court today issued a notice to Maharashtra Chief Minister, Devendra Fadnavis, after hearing a petition filed by Satish Ukey, claiming that the CM had allegedly concealed the pendency of two criminal cases against him in his 2014 election affidavit.
— ANI (@ANI) December 13, 2018
कोणते होते दोन फौजदारी खटले?
फडणवीस यांनी 1997 आणि 2000 मध्ये फौजदारी प्रकरणात जामीन घेतला. मात्र निवडणूकीसाठी उमदेवारीचा अर्ज भरताना त्यांनी ही माहिती लपविली असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे.
तसेच असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने सादर अहवालानुसार देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२ गुन्हे आहेत.