Sharad Pawar यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर NCP कार्यकर्ते, नेते भावूक; तातडीने निर्णय मागे घेण्याचं भावनिक आवाहन (Watch Video)
NCP | Twitter

मुंबई मध्ये आज वाय बी चव्हाण सेंटर मध्ये एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाध्यक पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशा मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. जो पर्यंत पवार आपला निर्णय मागे घेत नाहीत तो पर्यंत सभागृह न सोडण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान अनेक कार्यकर्ते आणि नेते शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर भावूक झाले आहेत. धनंजय मुंडे शरद पवार यांच्या पायावर लीन होत निर्णय मागे घेण्याचं आवाहन केले आहे.

शरद पवार यांनी एनसीपी पक्षाची एक कमिटी पुढील पक्ष अध्यक्ष बाबत निर्णय घेणार आहेत. कमिटी मध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह दिग्गज एनसीपी नेते असणार आहेत. त्यांच्याकडून घेतलेल्या निर्णयानंतर पुढील गोष्टी ठरतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. परंतू निर्णय तातडीने घ्यावा असं आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे. Jayant Patil यांना अश्रू अनावर; निवृत्त होण्याच्या Sharad Pawar यांच्या निर्णयाला विरोध (Watch Video) .

स्टेजवर कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यानंतर त्यांना दूर करताना सुरक्षा रक्षकांसह अजित पवार, सुप्रिया सुळे यांची दमछाक झाली आहे. काही मिनिटांच्या गोंधळानंतर स्टेज वरील गर्दी दूर करण्यात यश आलं. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना हात लावू नये असे देखील आवहन पवारांनी केलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून निर्णयाचा पुन्हा विचार करण्याचं आवाहन केले आहे. हा निर्णय त्यांनी कोणालाच विश्वासात घेऊन केला नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी देश आणि राज्याच्या वतीने पुन्हा विचार करावा असं म्हटलं आहे.