Mumbai Police | PC: Twitter

रविवार 27 मार्च दिवशी मुंबई (Mumbai) मध्ये  6  ठिकाणी रस्त्यांवर वाहनांची वर्दळ बंद करून नागरिकांना हे रस्ते फन अ‍ॅक्टिव्हिटीज साठी खुले ठेवले जाणार आहेत. पाश्चिमात्य देशांमधील ही लोकप्रिय पद्धती आता मुंबईतही आजमावली जाणार आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेत रस्त्यांवर वाहनं बंद ठेवत ते रस्ते चालण्यासाठी, सायकलिंगसाठी, स्केटिंगसाठी आणि योगा सह लहानमुलांना काही खेळ खेळण्यासाठी खुले ठेवले जाणार आहेत.

यंदाच्या रविवारी मुंबई ट्राफिक पोलिसांकडून हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील रविवारी देखील तो करायचा की नाही? याची चाचपणी केली जाणार आहे. स्थानिक सध्या या उपक्रमाबद्दल उत्सुक आहेत. नक्की  वाचा: Mumbai: दादर मेट्रो स्थानकाचे बांधकाम सुरु; पुढील 1 वर्षांसाठी वाहतुकीमध्ये झाले 'हे' बदल, जाणून घ्या सविस्तर.

Mumbai Police Tweet

कोणकोणत्या मार्गावर Sunday Street Initiative

मुंबई मध्ये 6 ठिकाणी रस्त्यांवर हा उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये पश्चिम उपनगरं, दक्षिण मुंबई मधील काही भाग यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मरीन ड्राईव्ह, लिकिंग रोड, माईंडस्पेस, कार्टर रोड, मुलुंड आणि बिकेसी या भागांचा समावेश आहे.

मुंबई मध्ये कोविडच्या लाटेपूर्वी अशा प्रकारे अ‍ॅक्टिव्हिज करण्यात आल्या होत्या. आता कोरोना संकट नियंत्रणात आल्याची चिन्हं आहेत. निर्बंध कमी झाल्याने पुन्हा नागरिक एकत्र जमू शकणार आहेत.