Chhatrapati Sambhaji Nagar Crime: प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, शिक्षकाला अटक, संभाजीनगर येथील घटना
Suicide | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीने आत्महत्या केल्यामुळे  शाळेतील शिक्षकाचे नाव समोर आले आहे. या घटनेनंतर गावत गोंधळ माजला आहे. शिक्षकाच्या जाचाला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु करत संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.  (हेही वाचा- अंधेरी येथील 4 मुले बेपत्ता, सावत्र आईवर संशय, पोलिसांकडून शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी जिल्ह्यात एका गावात ही घटना घडली आहे. गावातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थींनी टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध सुरु आहे. त्यात त्याच शाळेत शिकणाऱ्या शिक्षकावर संशय आला. मुलीने 17 मे रोजी आत्महत्या केलं होते. अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने विद्यार्थींचा छळ केला होता. या छळाला कंटाळून मुलीने राहत्या घरात गळफास घेतला.

तपासणीतून विद्यार्थींनीच्या बॅगेतून संशयित शिक्षकाचा फोटो असलेला घडाळा आढळून आले होते. मृत मुलीच्या कुटुंबानी पोलिसांत शिक्षकाविरोधात तक्रार नोंदवून घेतला. पोलिसांनी तक्रारीनंतर शिक्षकाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली पंरतु पोलिस चौकशी शिक्षकाने सर्व काही उघड केले.

काही दिवसांपूर्वी शिक्षकांने विद्यार्थींनीला प्रेमात अडकले. त्यानंतर प्रेमांचा खोटा सोंग करत मुलीला त्रास देऊ लागला. त्रासाला कंटाळून मुलीने आयुष्य संपवायचे ठरवले. शिक्षकाने मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असलाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शिक्षकाला अटक केले आहे. या घटनेनंतर सर्वीकडून संताप व्यक्त केला जात आहे.