Representational Image (Photo Credits: File Image)

छेडछाडीच्या त्रासाला वैतागून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील शेळवे (Shelve) गावात घडली आहे. स्वप्नाली गाजरे (वय, 17) असे मृत मुलीचे नाव आहे. स्वप्नालीच्या बॅगमध्ये मिळालेल्या चिठ्ठीनंतर संशयित आरोपींविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनने आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्वप्नाली कॉलेजला जात असताना गावातील तीन तरुण तिची छेडछाड करुन तिला सतत अपमानित करायचे. त्यांच्या या छेडछाडीला कंटाळून तिने 6 डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

स्वप्नाली ही घरापासून जवळ असलेल्या वाडीकुरोलीमधल्या कॉलेजमध्ये 11 च्या वर्गात शिकत होती. स्वप्नाली हिने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्यानंतर तिच्या वडिलांनी तिची बॅग तपासली. त्यावेळी तिच्या वडिलांना तिच्या बॅगेच एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठित तिने आपल्या आत्महत्येचे कारण लिहले आहे. कॉलेजला जात असताना गावातील तीघजण तिची सतत छेड काढायचे. याच त्रासाला वैतागून आमहत्या करत आहे, असे तिने या चिठ्ठीत लिहले आहे. याप्रकरणी संशियतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा-Satara Engineer Commits Suicide: महावितरण कंपनीत काम करणाऱ्या एका अभियंत्याची कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या

चिठ्ठीत काय लिहले?

“किती सहन करु मी… मला आता अजिबात होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नाही. कारण रमेश गाजरे, लहू टेलर आणि स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नांचा पार धुराळा केलाय. माझी सतत छेड काढून मला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे…”

स्वप्नालीच्या आत्महत्यानंतर गाजरे कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी तिचे नातेवाईकाकडून करण्यात येत आहे.