Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

एका 17 वर्षीय मुलीने दोनवेळा आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदा तिने विष प्राशन केले. परंतु, डॉक्टरांच्या आणि कुटुंबियाच्या प्रयत्नांमुळे तिचे प्राण वाचले. मात्र, जगायची इच्छा नसल्याने तिने रुग्णालयातच उपाचार सुरु असतानाच गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथील परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

पायल सुभाष मुसमाडे (वय, 17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पायलने गेल्या पाच दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला त्वरित राहुरी येथील रुग्णालयात दाखल केले. यावेळी कुटुंबीयांच्या आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे पायलला बचावता आले. परंतु, तिला जगण्याची इच्छा नसल्याने तिने उपचार सुरु असतानच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Nashik: पोलिसांकडून पार्टीवर छापेमारी करत जप्त केले ड्रग्ज आणि पैसे; अभिनेते, कोरियोग्राफर यांना घेतले ताब्यात

पायलने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली आहे? याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. तसेच आत्महत्येपूर्वी काही सुसाईड नोट लिहिली होती का? याचा तपास केला. मात्र, त्याठिकाणी कोणतीही सुसाईड नोटही सापडली नाही. त्यामुळे दोनवेळा आत्महत्या करण्यामागचे कारण अजूनही गूढ बनले आहे. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत, अशी माहिती न्यूज 18 लोकमतने दिली आहे.