अब की बार बाप-बेटे की सरकार! सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला
Sudhir Mungantiwar | (Photo Credits-Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार शेतकरी तसेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रबळ पाऊल उचलण्यात असफल आहे असे म्हणत, आज भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते, यामध्ये मुंबई (Mumbai) मधील आझाद मैदानात (Azad Maidan) भाजप नेत्यांकडून एक सभा घेऊन नागरिकांना संबोधित करण्यात आले. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठकरे यांच्या सरकारावत ताशेरे ओढत टीका केली आहे, अब की बार बाप-बेटे की सरकार असे म्हणत मुनगंटीवार यांनी ठाकरेंना टोलवले आहे. मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्यच ठरवणार सरपंच कोण, जनतेतून थेट निवड रद्द; अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर

प्राप्त माहितीनुसार, मुंबईत आझाद मैदानात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी भाषण करताना, उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशी टीका केली. तसेच मागील सरकारच्या योजनांची चौकशी करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला आव्हान करत, कितीशी चौकशी केली तरी, काही सापडणार नाही. मागील सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती, हेच ते विसरले आहेत, असंही सुनावले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारने जी आश्वासनं दिली गेली, त्याचं काय झालं? उद्धवजी यांनी शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी देणार होते, त्याचं काय झालं शेतकऱ्यांच्या बांधावर आश्वासन दिलं गेले मात्र पाळण्यात आलं नाही असे म्हणताना गझनीमध्ये आमिर खान विसरायचा, हे सरकार गझनीचे बाप आहे असा शाब्दिक हल्ला मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेच्या बाबत बोलताना हिंगणघाट येथे एका बहिणीला पेटवलं जातं, हे सरकार बघत बसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, पण महिलांना सुरक्षा देत नाहीत असे म्हणताना मुनगंटीवार यांनी गृहमंत्री किती दिवसांत या ठिकाणी गेले असा सवाल उपस्थित केल्याचे समजतेय.