Zilla Parishad Students Speak Japanese Language (PC - ANI)

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेचे धडे गिरवले (Zilla Parishad Students Speak Japanese Language) असून आता ते उत्तमरित्या जापनीज भाषा बोलत आहेत. ही जिल्हा परिषद शाळा गाडीवाट (Gadiwat village) गावातील आहे. या शाळेतील बर्‍याच शिक्षकांनी जपानी भाषा (Japanese Language) शिकवून घेतली आहे. विद्यार्थ्यांना नोकरीभिमुख शिक्षण देणे हे यामागचं मुख्य उद्दीष्ट आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि एलोरा लेण्यांना अनेक जापनीस पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे जर या विद्यार्थ्यांना जापनीज भाषा समजली आणि बोलता आली तर ते या पर्यटकांसाठी उत्तम मार्गदर्शक होऊ शकतात, असं जिल्हा शिक्षण अधिकारी एस.पी. जयस्वाल (Education Officer SP Jaiswal) यांनी म्हटलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने या गावातील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात हे विद्यार्थी जापनीज भाषेतून उत्तमरित्या संवाद साधताना दिसत आहेत. गाडीवाट हे गाव औरंगाबाद शहरापासून सुमारे 25 किलोमीटरवर अतंरावर आहे. या गावात आतापर्यंत मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. मात्र, इंटरनेट सेवा येथील जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे. या जिल्हा परिषद शाळेने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये एक परदेशी भाषा कार्यक्रम सुरू करण्याच निर्णय घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत इयत्ता चौथी ते आठवपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपली आवडती एक भाषा निवडण्यास सांगितले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जापनीस भाषेला पसंती दिली होती. त्यानंतर शाळेत जापनीज भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (हेही वाचा - Shivaji University: डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती; अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव)

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी इंटरनेटवरील व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे धडे दिले. औरंगाबादचे भाषा विशेषज्ञ सुनील जोगदेव यांनी या विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकवण्यास मोठी मदत केली. आतापर्यंत या शाळेतील तब्बल 60 हून अधिक विद्यार्थ्यांना जापनीज भाषा बोलता येत आहे. गाडीवाट जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांना नोकरीभिमुख शिक्षण देऊन राज्यातील सर्व शाळांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे.