BEST Double-Deckers (Photo Credits-Twitter)

गेले तीन दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी (BEST Employee Strike) संप पुकारला आहे. दिवाळीच्या (Diwali) मुहुर्तावर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने मुंबईकरांना वाहतुकीचा चांगलाचं फटका बसला आहे. तरी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून (BEST Contract Employees) हा संप पुकारण्यात आला आहे. 22 ऑक्टोबर पासून या संपास सुरुवात झाली असुन विविध आगारातील कर्मचारी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सांताक्रुज (Santa Cruz) आगारातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी संप पुकारला होता तर काल जोगेश्वरी (Jogeshwari) आगारातली कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं होतं. आज तर ऐन दिवाळीच्या दिवशी मरोळ (Marol) बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या मांडत

आक्रमक झाले आहेत.

 

गेले वर्षी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) एसटी महामंडळा विरुध्द संप पुकारला होता. पगारवाढीसह विविध मुद्द्यावरुन त्यांनी महामंडळा विरोधी आक्रमक झाले होते. पण यावर्षी मुंबईकरांची (Mumbai) जीवनवाहिनी बेस्टच्या (BEST Bus) कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांना शहरातील प्रवासाला अडचण निर्माण होण्याचे चिन्ह आहे. तरी हा संप बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून (BEST Bus Employee Strike) पुकारण्यात आला आहे. (हे ही वाचा:- BEST Employees Strike: बेस्टच्या शेकडो बस कर्मचाऱ्यांचा संप, ऐन दिवाळीत मुंबईकरांना संपाचा फटका बसण्याची शक्यता)

 

पगारवाढीसह दिवाळीचा बोनस (Diwali Bonus) अशा विविध मागण्यासह कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तरी मुंबईतील विविध बेस्ट बस डेपो (BEST Bus Depot) पैकी फक्त सांताक्रुजमधील शेकडो कंत्राटी कर्मचारी (Contract Employees) संपावर गेल्याने पश्चिम मुंबई (Western Mumbai) भागातील नागरिकांना वाहतूकीचा फटका बसत आहे.