'भाजपमध्ये धाडसी आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद, कलम ३७० रद्द करून सरकारने हे दाखवून दिले'- मोहन भागवत
Mohan Bhagwat (Photo credits- ANI)

दसऱ्याच्या (Dussehra) मुहूर्तावर आज (8 ऑक्टोबर) नागपूर (Nagpur) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) श्री विजयादशमी मेळावा (Vijayadashmi Melava) पार पडला आहे. या मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी कलम 370 (Article 370) चा मुद्दामांडून सरकारवर टिका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. या मेळाव्याला एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंगदेखील उपस्थित होते.

नुकताच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा श्री विजयादशमी मेळावा पार पडला. दरम्यान, या मेळाव्यात मोहन भागवत यांनी भाजप सरकारचे कौतुक करत विरोधांवर टिका केली आहे. या देशाच्या सरकारमध्ये धाडसी आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद केवळ भाजप सरकारमध्ये आहे, कलम 370 रद्द करून सरकारने ते दाखवून दिले आहे. जनतेने भाजपला मोठ्या संख्येने निवडून दिले आहे. जनतेने पुन्हा भाजपवर विश्वास दाखवला आहे. केंद्रात भाजप सरकार आल्याने देशात काही तरी व्हायला लागले आहे असा विश्वास लोकांना वाटू लागला आहे, अशा शब्दात मोहन भागवत यांनी भाजप सरकारचे कौतुक केले. हे देखील वाचा- RSS Dussehra Rally 2019: देशात 'मॉब लिंचिंग'च्या नावाने हिंदू धर्माची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरु आहे- मोहन भागवत

"देशात केवळ एकाच समाजाने दुसऱ्या समाजावर अत्याचार केले, असे बोलणे चुकीचे आहे. तर, अन्य समाजातील लोकांनही इतर समाजावर अत्याचार करतात. एखाद्या समुदायातील ठराविक लोकांवर अत्याचार केले याचा अर्थ संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही. हिंसक घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीएक संबंध नसतो. मात्र, अशा गोष्टींसाठी संघाला जबाबदार धरले जाते. संघ अशा घटना रोखण्याचे काम करतो," असेही मोहन भागवत म्हणाले आहेत.