आजकाल अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. काही भागात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. ठाण्यातही एका बस स्टॉप जवळ कोसळलेलं झाडं काढण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची एक घटना समोर आली आहे. गावदेवी भागात ही घटना बुधवार, 22 जानेवारीच्या रात्रीच्या वेळेस घडली आहे. नक्की वाचा: Tragic Accident in Mumbra: कुत्रा डोक्यात पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; मुंब्रा येथील घटना (Watch Video).
Civic Emergency Response Cell ला रात्री 11 च्या सुमारास कॉल आला होता. Thane Municipal Corporation's disaster management cell chief Yasin Tadvi यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस स्टॉप जवळ झाड पडल्याचं त्या कॉल मध्ये सांगण्यात आलं होतं. civic body's fire services आणि regional disaster management cell चे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. ते पडलेले झाड कापण्यात व्यस्त असताना, परिसरातील एका भटक्या कुत्र्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि पळून जाण्यापूर्वी त्यापैकी दोघांना गंभीरपणे चावा घेतला, असे अधिकाऱ्याने सांगितले. BMC Animal Complaint App: कुत्रा चावला, मांजर हरवले, भटक्या प्राण्यांची नसबंदी; सर्व तक्रारी एकाच छताखाली, बीएमसी ॲप लाँच .
26 आणि 37 वयाच्या दोन जवानांना कळवा येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. इतर नागरी कर्मचाऱ्यांनी पडलेल्या झाडाला परिसरातून काढून टाकले, असे अधिकाऱ्याने सांगितले.