'बंद करा युतीया बनवायचा धंदा' असे म्हणत मनसे च्या 'या' बड्या नेत्याने शिवसेना-भाजपला लगावला टोला
MNS | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रातील सत्तास्थानपनेचा तिढा काही सुटत नाही अजूनच चिघळत चालल्याचे दिसत आहे. त्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 'महाशिवआघाडी' ची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र अजूनही कोणत्याच पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात रंगलेला हा खेळ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून तो आता सोशल मिडियावरही रंगू लागला आहे. नेटकरी या राजकारणाची खिल्ली उडविण्याची एकही संधी सोडत नाही. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सत्ता स्थापनेच्या या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे. इतकच नव्हे या माध्यमातून त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

'बस करा आता युतीया बनवायचा धंदा', असे परखड शब्दांत मनसे स्टाईल अमेय खोपकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- शिवसेनेशी दुरावा; आता मनसे सोबत करणार का भाजप युती? काय होणार नाशकात?

खोपर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या या पोस्टमध्ये राज्यातील शेतकऱ्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असताना राजकारण्यांकडे त्यांचे डोळे पुसण्यासाठी वेळ नाही अशी खंत खोपकर यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली होती. “अन्नदात्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला जात असताना त्याला आधार देण्याची गरज आहे. ओल्या दुष्काळाने ओले झालेले त्यांचे डोळे पुसायला कुणीच नाही. शिवसेना-भाजपाचा सगळा वेळ निव्वळ स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी जातोय. आता खरचं या गलिच्छ राजकारणाचा किळस यायला लागला आहे. बस करा आता युतीया बनवण्याचा धंदा,” अशी पोस्ट खोपकर यांनी केली आहे. ट्विटवरुन मनसेच्या एका पेजने या पोस्टचा स्क्रीनशॉर्ट ट्विट केला आहे. हा स्क्रीनशॉर्ट खोपकर यांनी स्वत:च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन रिट्वीट केला आहे.

काही दिवसांपूर्वीच खोपकर यांनी “राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून आज राज ठाकरे हे नेता म्हणून किती भक्कम आहेत हे जाणवतं,” अशी एक पोस्ट सोशल नेटवर्किंगवरुन केली होती. “माझ्या राज्यात इतकी अस्थिर राजकीय परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही, असेही ते म्हणाले होते.

मात्र त्यांच्या नवीन वक्तव्याने राजकीय वातावरण आणखी गरम होईल असे म्हणायला हकरत नाही.