Vehicle Carrying EVMs Attacked with Stones (फोटो सौजन्य -X/@LokmatTimes_ngp)

Vehicle Carrying EVMs Attacked with Stones: नागपुरातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतदानाच्या दिवशी नागपुरात ( Nagpur) इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (Electronic Voting Machines ) घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. हा हल्ला बुधवारी संध्याकाळी 7:00 ते 7:30 च्या दरम्यान झाला. मध्य मतदारसंघातील (Nagpur Central Constituency) किल्ला परिसरातील बूथ क्रमांक 268 वरील ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तवेरा वाहनातील ईव्हीएम आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री केली. खराब झालेले वाहन कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या नियुक्त ठिकाणी पोहोचवण्यात आले. (हेही वाचा -Exit Poll Results 2024 For Maharashtra: महायुती चं सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार; एक्झिट पोल्सचे अंदाज)

या घटनेनंतर कोतवाली पोलिस ठाण्याबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून जमावाला पांगवले. ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनाच्या तोडफोडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - MATRIZE Exit Poll for Maharashtra: ABP-Matrize च्या एक्झिट पोल नुसार महायुती च्या पारड्यात 150-170 जागा जाण्याचा अंदाज .)

ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनावर दगडफेक, पहा व्हिडिओ - 

दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपली. परंतु, राज्यभर ईव्हीएम तोडफोडीच्या आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.