भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर (Bhusawal Nandurbar Passenger Train) वर सुमारे अर्धा तास दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रेनमध्ये साखळी खेचून मध्येच ट्रेन थांबवून तिच्यावर दगडफेक झाली आहे. ही घटना काल 12 जुलै च्या संध्याकाळची आहे. अमळनेर (Amalner)
जवळील ही घटना आहे. सुदैवाने यामध्ये कोणाही प्रवाशाला दुखापत झालेली नाही मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.
भुसावळहून नंदुरबारकडे जाताना पॅसेंजर ट्रेन वर हा हल्ला झाला. अमळनेर रेल्वेस्थानकावरून 11 वाजता ही ट्रेन सुटली. यामध्ये हजारो यात्रेकरू प्रवास करत होते. भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही यात्रेकरूंनी धार टेकडीजवळ साखळी ओढली आणि ट्रेन थांबवली. त्यानंतर काही जण खाली उतरले अशावेळी ट्रेनवर दगडफेक सुरू झाली.
भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर वर दगडफेक
महाराष्ट्र के जलगांव जिले के पैसेंजर ट्रेन पर पथराव..
*जलगांव जिले के अमलनेर इलाके में चेन पुलिंग करके कई अज्ञात लोगों ने किया पथराव..*
भुसावल से नंदूरबार जा रही थी यह पैसेंजर ट्रेन..
पूरे मामले की जांच में जुटी है रेलवे पुलिस..#MaharashtraNews pic.twitter.com/cb7uGzX422
— Vivek Gupta (@imvivekgupta) July 13, 2024
ट्रेनवर दगडफेक सुरू होताच प्रवाशांनी भीतीपोटी आरडाओरड सुरू केली. दरम्यान या दगडफेकीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. काही वेळाने ट्रेन हळूहळू पुढे नेण्यात आली.