भारतीय शेअर बाजारात (Share Markets) आज मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळाले. शुक्रवारी (6 मे) बाजार सुरु झाला तेव्हापासूनच बाजारात घसरण (Stock market Collapses) पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजार सुरुवातीला 850 अंकांनी घसरला तर निफ्टी 16,450 पेक्षाही खाली आल्याचे पाहायला मिळाले. जागतिक शेअर बाजारातही पडझड झाल्याने भारती शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. ऑटो इंडेक्स प्रामुख्याने 2% घसरल्याचे पाहायला मिळाले. निफ्टीमध्ये ऑटो शेअर बाजारात टाटा मोटर्स, भारत फोर्ज, ट्यूब इन्वेस्टमेंट ऑफ इंडिया सर्वाधिक तोटा सहन करताना आढळून आले. दुसऱ्या बाजूला सेन्सेक्स मध्ये मेटल समभाग घसरले. एपीएल अपोलो ट्यूब्स, सेल, हिंदाल्को आदी शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मेटलच्या समभागामध्ये 3% घसरण पाहायला मिळाली.
सकाळी 9.52 वाजता सेन्सेक्समध्ये 765.67 अंकांची म्हणजेच 1.37% घसरण पाहायला मिळाली. त्या वेळी इंडेक्स 54,936.56 इतक्या पातळीवर होता. तर निफ्टी 235.80 म्हणजे 1.41% घसरणीसह 16,446.85 वर आला होता. बाजार सुरु झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्समध्ये एमएंडएम आणि आयटीसी वगळता इतर समभाग मोठी डूबकी मारताना दिसले. सर्वाधिक नुकसान हे फिनजर्व, बजाज फाइनांन्स, एचसीएल टेक, विप्रो आणि हिंदुस्तान यूनिलीवर यां कपन्यांमध्ये पाहायला मिळाले. (हेही वाचा, Share Markets: आरबीआयने रेपो दर वाढवताच, शेअर बाजार कोसळला; जाणून घ्या घडामोडी)
दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाही मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे पाहायला मिळते आहे. काल तेजीत असलेला रुपया आज डॉलरच्या तुलनेत 38 पैशांनी घसरला आहे. सध्या तो 76.38 वर स्थिर असल्याची माहिती होती.