कोरोना विषाणूने भारतात हाहाकार माजवला आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून महत्वाची ठोस पावले उचलले जात आहेत. राज्यात कोरोना टेस्टींग लॅबची (Corona Test Labs) कमतरता असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यासाठी विलंब होत आहे. यामुळे करोना संशयित रुग्णांची अधिकाधिक चाचणी करण्यात यावी, याकरिता राज्यात आणखी 32 प्रयोगशाळांची उभारणी केली जाणार आहे. कोरोना टेस्ट लॅबची उभारणी झाल्यानंतर राज्य सरकारला याचा अधिक फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांनी आपला जीव गमवला आहे. तर, 20 लाखांहून अधिकजण कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. सध्या 170 हून अधिक देशात कोरोनाने थैमान घातला आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. आता भारतातही कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. भारतात आतापर्यंत एकूण 18 हजार 601 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 590 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 हजार 252 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 666 वर पोहचली आहे. यापैंकी 232 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 572 जण कोरोनामुक्त झाले आहे. हे देखील वाचा-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयीन पथकाने आज पुणे महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाचा घेतला आढावा
महाराष्ट्रात आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली होती. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका असेही आवाहन त्यांनी केले होते. कोरोनाची लक्षणे लपवणे अत्यंत चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्यांची संख्या अधिक आहे. थोडीशी जरी लक्षणे आढळली तर, तातडीने डॉक्टरांकडे जा असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.