वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभुमीवर दिलासा! बोनस दिला जाणार असल्याची नितीन राऊत यांची घोषणा
Nitin Raut (Photo Credit: ANI)

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर खुशखबर आहे. कारण राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील 1 लाख कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून बोनस देण्यासाठी 125 कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचे ही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांनी त्यांना पगार वाढ झाल्याचा दुसरा हफ्ता आणि संघटनांनी कामगारांना सानुग्र, अनुदान द्यावे अशी मागणी केली होती. त्यानुळे याबद्दल निर्णय न झाल्यास त्यांनी संपावर जाण्याचा इशारा सुद्धा दिला होता.(Muhurat Trading 2020: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवाळीत मुंबई शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग? जाणून घ्या वेळा!)

शुक्रवारी दुपारी नितीन राऊत यांची राज्यातील 25 संघटनांसोबत वर्च्युअली बैठक घेतली. मात्र त्यावेळी काही समस्या निर्माण झाल्याने भर दिवाळीच्या सणात नागरिकांना अंधारात रहाण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. याच कारणास्तव नितीन राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे आता कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे. (दिवाळीचा सण आनंद, उत्साहात सजारा करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन)

तर वीज कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षाप्रमाणे सानुग्रह अनुदान रक्कमेची घोषणा पुढील तीन-चार दिवसात केली जाणार आहे. याबद्दल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा ही केली जाणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. ऐवढेच नाही तर दीवाळीच्या सणासुदीच्या काळात वीज कर्मचाऱ्यांनी असे कोणतेच काम करु नये ज्याचा परिणाम वीज ग्राहकांना होईल असे ही आवाहन करण्यात आले आहे.