COVID19: मुंबईतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रूग्णालयाचे कर्मचारी अर्जुन नरिंगरेकर कोरोनामुक्त; रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी 101वा वाढदिवस साजरा करत त्यांना दिला निरोप

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रूग्णालयाचे (Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Hospital) कर्मचारी अर्जुन गोविंद नरिंगरेकर (Arjun Govind Naringrekar) यांनी वयाच्या 101व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. अर्जुन गोविंद नरिंगरेकर यांना 15 दिवसआधी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपाचारासाठी जोगेश्वरी पूर्व येथील बीएमसीच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस एकदिवस आधीच साजरा करत त्यांना निरोप दिला आहे.

अर्जुन गोविंद नरिंगरेकर यांचा जन्म 15 जुलै 1920 रोजी झाला होता. नरिंगरेकर यांनी शिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. मात्र, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना 1 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांची विशेष काळजी घेतली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एकदिवस आधीच त्यांचा 101वा वाढदिवस साजरा करत त्यांना निरोप दिला आहे. त्यावेळी अर्जुन गोविंद नरिंगरेकर भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. हे देखील वाचा- ठाणे: कोविड19 वर मात केल्यानंतर एका महिन्याने आईची तिच्या नवजात मुलीची घडली भेट

एएनआयचे ट्विट-

महाराष्ट्रात आज 6 हजार 741 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 213 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 67 हजार 665 वर पोहचली आहे. यापैकी 10 हजार 695 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 49 हजार 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे.