Hospital Death | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) सेंट जॉर्ज रुग्णालयातील (St. George Hospital) एका सफाई कामगाराचा वैद्यकीय निष्काळजीपणा (Medical Negligence) आणि उपचाराअभावी मृत्यू (Hospital Death) झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. आश्चर्यकारक म्हणजे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तीन तास उलटले तरीही डॉक्टरांचा पत्ता नव्हता. परिणामी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे. अनिश कैलाश चौहान असे पीडित कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे जखमेवर टाके घालण्यासाठी तो प्रदीर्घ काळ डॉक्टरांची रुग्णालयात वाट पाहात होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डोक्याभोवती पट्टी बांधून काळजीयुक्त चेहऱ्याने डॉक्टरांची वाट पाहात बसलेला हा तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

उपचारांना उशीर: चौहानचे कुटुंब आणि मित्रांचा दावा आहे की, वैद्यकीय निष्काळजीपणा आणि  सेवा मिळण्यास उशीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. चौहाण याचे आप्तेष्टांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले असून, प्रशासनाचा निषेध करण्यासाठीते रुग्णालयात जमले होते. (हेही वाचा, TB Patients Absconds Sewri Tuberculosis Hospital: मुंबईच्या शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमधून चार वर्षात 80 हून अधिक क्षयरोगी पळाले)

कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्यांकडूनही आरोप: रुग्णालयातील सहकारी कर्मचाऱ्यांनी पीडितावरील उपचारांच्या विलंबासाठी डॉक्टरांना जबाबदार धरले आहे. प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर चौहान याच्यावरील उपचारासाठी अखेर एका इटर्न डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, असे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांची प्रतिक्रिया: दरम्यान, दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाईक, आप्तेष्ठांनी रुग्णालयात गर्दी केल्यानंतर झोन 1 चे डीसीपी प्रवीण मुंढे आणि इतर पोलीस घटनास्थळीदाखल झाले. पोलिसांनी संतापलेल्या नागरिकांना शांत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. (हेही वाचा, Medical Negligence: डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन; महिलेचा मृत्यू; केरळ राज्यातील घटना)

कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी

चौहान यांचे मित्र आदित्य माहिमकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जबाबदारांवर कठोर कारवाई होईपर्यंत ते मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. तसेच तो इतरत्रही हालवू देणार नाही. संतप्त नागरिकांनी या वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या निलंबनाची मागणी केली.

दरम्यान, या अनपेक्षीत घटनेमुळे नको त्या कारणासाठी रुग्णालय चर्चेत आले आहे. तसेच, या घटनेमुळे सेंट जॉर्ज रुग्णालयातील व्यवस्थापनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. हे रुग्णालय म्हणजे सरकारी सुविधा आहे ज्यांना रुग्णांवरील उपचारपद्धतींबद्दल या आधीही टीकेचा सामना करावा लागला आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे आणि सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्था सुधारण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या अधिक आणि कर्मचारी कमी अशी स्थिती आहे. अनेकदा डॉक्टर तातडीच्या शस्त्रक्रिया, करण्यात गुंतलेले असतात. अशा वेळी व्यवस्थेवर ताण निर्माण होतो.