ST Employees Strike: खाजगीकरण बंद करणे, जुन्या बस चालनातून काढून टाकणे, कर्मचा-यांना सुखसोईचे विश्रांतीगृह देणे अशा आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. उद्या 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत संप (ST Workers Strike) पुकारले आहे. या सर्व मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव(Ganeshotsav 2024) राज्यभरात साजरा केला जाणारा आहे. त्याआधीच एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारल्याने राज्यभरात नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
लालपरीने तिकीट बुक करून अनेकांनी गणेशोत्सवात जावी जाण्याचे नियोजन आखले आहे. जर, संप जास्त दिवस सुरू राहिला तर नागरिकाना त्यांच्या गावी जाता येणार नाही. एस टी कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवावी यासाठी राज्यभरात निदर्शने झाली आहेत. उद्यापासून म्हणजेच ३ सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू होणार आहे. त्यामुळे राज्य सरकार याकडे कसे पाहतं हे पाहण गरजेच राहील. (हेही वाचा: Ganpati Special ST: चाकरमान्यांसाठी लालपरी सज्ज; मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 75 टक्के जादा बसेस बुक)
आज दुपारी दीड वाजता मुंबई सेंट्रल येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारला मागण्या मान्य करण्याविषयी शेवटचा इशारा देण्यात आला. आज जर मागण्या मान्य झाल्या नाही, तर उद्या तीन सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संप करण्यात येईल असे सांगण्यात आले. (हेही वाचा:ST Bus Pass: विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची विशेष मोहीम; आता शाळा-महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा पास)
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
- राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे
- महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळणे
- खाजगीकरण बंद करणे.
- सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा.
- इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा.
- जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.
- चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या
- वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पाहिजे, प्रलंबित महागाई भत्ता व फरक, वाढीव घरभाडे भत्ता व फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या 5000, 4000, 2500 ऐवजी सरसकट पाच हजार वेतन वाढ मिळणे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना पेंशन मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करणे. विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभर प्रवासाचा मोफत पास देणे अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.