Rainfall | Image used for Representational purpose only | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासांपासून सर्वत्र पाऊस सुरु झाला आहे. राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत हवामान विभागाने (India Meteorological Dept) नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर (Maharashtra-Goa Coast) 5-6 जुलैला 50-60 किमी प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच पुढील 24 तासात मुंबई व उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशीही माहिती हवामान विभागाने दिली आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईसह उपनगरात गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. ज्यामुळे सखल भागात पाणी साठले आहे. तसेच पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कमाल तापमान 24 तर, कमान तापमान 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईच्या समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना हाय टाइडचा इशारा देण्यात आला आहे. याचदरम्यान कुलाबा परिसरात राहणाऱ्या मच्छिमारांची स्थानिक प्रशासनाकडे मदतीसाठी मागणी केली आहे. हे देखील वाचा- Mumbai Rain: मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो!

एएनआयचे ट्वीट- 

65 ते 115 मिमी पावसाची नोंद मुसळधार पाऊस म्हणून केली जाते आणि 115 ते 200 किमी पावसाची नोंद मुसळधार ते अतिमुसळधार अशी केली जाते. तर, 200 किमी पेक्षा अधिक पावसाची नोंद अतितीव्र मुसळधार किंवा अतिवृष्टी अशी केली जाते.