Passengers Response to Pune Metro (PC- Twitter)

Passengers Response to Pune Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पुणे मेट्रो (Pune Metro) ला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी दोन्ही मार्गांवर 37,752 पुणेकरांनी मेट्रोच्या प्रवासाचा आनंद लुटला. पुण्यातील सुमारे 33 किलोमीटर अंतरासाठी मेट्रोचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी 12 किमीपर्यंतचे मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. वनाज ते रामवाडी हा एकेरी मार्ग 13 किलोमीटरचा आहे. तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या 12 किलोमीटरच्या मार्गात पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी ते 7 किलोमीटरचा मार्ग तयार आहे. सध्या पुण्यात एकूण 12 किलोमीटरमध्ये मेट्रो धावत आहे. सध्या साडे 21 किलोमीटरपर्यंतच्या मार्गाचे काम बाकी आहे.

महामेट्रोने वनाज (Vanaj) ते गरवारे कॉलेज (Garware College) आणि फुगेवाडी (Fugewadi) ते पिंपरी-चिंचवड असा 12 किमीचा मेट्रो मार्ग तयार केला आहे. मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत मेट्रो सहा तास सुरू राहिली. त्यामुळे दुपारपासूनच सर्व स्थानकांवर नागरिकांची गर्दी होती. मेट्रोच्या जवळपास सर्वच फेऱ्या हाऊसफुल्ल होत्या. (वाचा - पुण्यातील Prachi Dhabal Deb ने बवलेल्या Biggest Royal Icing Structure ची World Book of Records मध्ये नोंद; 100 किलो केक बनवून केला जागतिक विक्रम)

पहिल्या दिवशी 5 लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न

रात्री 9 वाजता मेट्रोची शेवटची भेट, वनाज-गरवारे कॉलेज मार्गावर 15 हजार 842 नागरिकांनी प्रवास केला. तर फुगेवाडी-पिंपरी मार्गावर 6 हजार 995 नागरिकांनी प्रवास केला. पहिल्याचं दिवशी मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे महामेट्रोचे जनसंपर्क महासंचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

दोन्ही मार्गावर एकूण 37 हजार 752 जणांनी प्रवास केला आहे, तर दोन्ही मार्गावर 12 फेऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे महामेट्रोला 5.53 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.