Mahalaxmi Car Accident (Photo Credits: ANI)

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सजवळ (Mahalaxmi Racecourse) सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. ह्या अपघातात भाजी विकत घेण्यासाठी चाललेल्या एका पादचा-याला भरधाव वेगाने येणा-या मर्सिडीजने धडक दिली. ह्या धडकेत त्या पादचा-याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी मर्सिडीज चालक चैतन्य अदानीला (Chaitanya Adani) अटक केली आहे. हा कारचालक हिरे व्यापारीचा मुलगा असल्याचे वृत्त एबीपी माझा ने दिले आहे.

हाजी अली रोडवरील सिग्नल सुटल्यानंतर चैतन्यची मर्सिडीज दुसऱ्या कारला ओव्हरटेक करुन महालक्ष्मी स्टेशनच्या दिशेने जात होती. त्यावेळी चैतन्य अदानीचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व त्यांनी रस्त्यावरुन चालत असलेल्या राजेंद्र कुमार यांना चिरडलं.

Road Accident Near Nashik: नवस फेडून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला नाशिक मार्गावर भीषण अपघात, 4 जण ठार, 6 जण गंभीर जखमी

हा अपघात इतका भीषण होता की, चैतन्यची मर्सिडीज महालक्ष्मी रेसकोर्सची संरक्षण भिंत तोंडून आत शिरली. ताडदेव पोलिसांनी चैतन्यला अटक केली असून त्याला आज कोर्टात हजर करण्यात येईल .