मुंबई (Mumbai) हे असे ठिकाणी आहे जेथे जगभरातून मंडळी येथे विविध कामांसाठी येत असतात. तसेच मुंबईत टोलेजंग इमारती पाहून दुसऱ्या राज्यातून आलेल्या प्रत्येकाला मुंबईत आपले घर असावे असे वाटते. त्यातच आता दक्षिण मुंबई सारख्या आलिशान ठिकाणी घर घेणे म्हणजे सामान्यांना परवडणारे नाही. परंतु दक्षिण मुंबईतील ताडदेव (Tardeo) येथील स्लीटर रोड येथे 800 चौरस फूटाचा एक फ्लॅक गेली 11 वर्षे रिकामा असून अद्याप तेथे कोणाही राहत नाही. तसेच या फ्लॅटचे भाडे फक्त 64 रुपये असल्याचे सांगितले जाते.
धुनजीबॉय बिल्डिंगमध्ये हा 800 चौरसफूटाचा फ्लॅट असून 1940 रोजी मुंबई पोलिसांमधील पारसी अधिकाऱ्यांना पारसी समाजाकडून देण्यात आला होता. या फ्लॅटचे हक्क पारसी ट्रस्ट आर डी महालक्ष्मीवाला चॅरिटी बिल्डिंग ट्रस्टकडे आहेत. या ट्रस्टने फक्त पारसी पोलीस अधिकाऱ्यांना राहण्यासाठी देण्यात येईल अशी मुंबई पोलिसांसमोर अट घातली होती. परंतु गेल्या 11 वर्षापासून हा फ्लॅट खाली आहे. तर उपायुक्त फिरोज गंजिया येथे यापूर्वी राहत होते. परंतु 2008 मध्ये ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यापासून हा फ्लॅट खाली आहे. तर सध्या मुंबई पोलिसात फक्त दोन पारसी पोलिस अधिकारी असल्याचे संतोष रस्तोगी यांनी सांगितले आहे. त्यामधील एक अधिकाऱ्यांकडे स्वत:चा फ्लॅट असून दुसऱ्या अधिकाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
या फ्लॅटसाठी मुंबई पोलिसांमधील काही कर्मचाऱ्यांनी अर्ज केला आहे. परंतु पारसी ट्र्स्टच्या अटीमुळे अद्याप हा फ्लॅट कोणाला देण्यात आलेला नाही.(हेही वाचा-मुंबईकर 'अब्दुल्ल खान'ला Google चं 1.2 कोटीचं पॅकेज; ना जॉब अॅप्लिकेशन, ना IIT चा विद्यार्थी, पहा तरीही कशी मिळाली इतकी मोठी संधी)