सोलापूर (Solapur) येथे रेल्वेस्थानकावरुन धावणाऱ्या मेल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 529 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 2 लाख रुपयांची दंडवसुली रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
सोलापूरातील रेल्वेस्थानकांवर विशेष तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात आली. त्यामध्ये विनातिकिट प्रवासी,पॅसेंजर गाड्यांची तपासणी आणि मेल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विविध कारणे देत रेल्वे प्रशासनाचे नियम टाळले. मात्र रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करत विनातिकिट प्रवाशांकडून चांगलाच दंड वसूल केला आहे. (हेही वाचा-Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडी 2019 यात्रेसाठी मुंबई, पुणे येथील भाविकांसाठी मध्य रेल्वे चालवणार 10 विशेष ट्रेन्स, 16 फेब्रुवारीपासून बुकिंग होणार सुरू)
त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने तिकिट घेऊन प्रवास करवा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच येत्या काही दिवसातात सातत्याने तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात येणार असल्याचे ही प्रशासनाने प्रवाशांना सांगितले आहे.