Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

हिंगणघाट येथे तरुणीला भररस्त्यात जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.देशात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर सोलापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच आरोपी हे रिक्षाचालक असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून पीडित अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार करण्यात येत होता. मंगळवारी पीडित मुलगी एका मंदिराजवळ रडत बसली असता तिला स्थानिकांनी त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे घटना समोर आल्यानंतर तातडीने त्याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी याबाबत पीडितेला विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याचवेळी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असून 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.(धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 21 वर्षीय तरुणीचा रिक्षात विनयभंग; स्वत:चा बचाव करण्यासाठी मुलीने मारली उडी)

पीडिता ही सोलापूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. तर आरोपी हे रिक्षाचालक असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणी पळ काढलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच विविध कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.