Maharashtra Assembly Elections 2019 (Photo Credit: File Photo)

सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ येतात. करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, अशी या मतदारसंघांची नावे आहेत. या निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टरही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विविध अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

 

अक्कलकोट मतदारसंघ क्रमांक- 250

अक्कलकोट मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्यात भाजपचा बालाबोला नव्हता तेव्हा पहिल्यांदाच 1995 साली दिवंगत बाबासाहेब तानवडे यांच्या रुपाने भाजपने या मतदार संघात विजय मिळवला होता. विधानसभा निवडणूक 2014 साली काँग्रेसचे आमदार सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी अक्कलकोट मतदारसंघातून विजयी झाले होते. म्हेत्रे यांना विधानसभा निवडणुकीत 97 हजार 333 मत मिळाले असून भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांचा 17 हजार 644 मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील अक्कलकोट मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- सचिन कल्याण शेट्टी (भाजप), सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस), धर्मराज राठोड (वंचित बहुजन अघाडी), मधुकर जाधव (मनसे)

सोलापूर दक्षिण मतदारसंघ- 251

सोलापूर मतदारसंघात एकूण 283 मतदारसंघ आहेत. सोलापूर हा महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा जिल्हा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भारतीय जनात पक्षाचे आमदार सुभाष सुरेशचंद्र देशमुख यांनी विजय मिळवला होता. यावेळी भारतीय राष्ट्रीय पक्षाचे दिलीप माने हे विरुद्ध उभे होते. देशमुख यांना 97 हजार 333 मत पडली होती, तर दिलीप माने यांना 42 हजार 942 मत मिळवता आली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील सोलापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- सुभाष देशमुख (भाजप), मौलाबी सय्यद (काँग्रेस), बाळासाहेब बंडगर (वंचित बहुजन अघाडी)

पंढरपूर मतदारसंघ क्रमांक- 252

भारतीय राष्ट्रवादी पक्षाचे जायन्ट किलर म्हणून ओळखले जाणारे भारत तुकाराम भालके यांनी पंढरपूर मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणूक 2014 साली भालके यांना 91 हजार 863 मत मिळाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे प्रशांत परिचाकर यांचा 8 हजार 886 मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील पंढरपूर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- सुधाकर परिचारक (भाजप), शिवाजीराव काळुंगे (काँग्रेस), भारत भालके (राष्ट्रवादी)

सांगोला मतदारसंघ क्रमांक- 253

सांगोला मतदार संघातून गणपतराव अण्णासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत. गणपतराव यांनी विधानसभा निवडणूक 2014 मध्ये शिवसेनेचे शहाजी पाटील यांचा पराभव केला होता. सांगोला विधानसभा मतदारसंघात गेल्या 60 वर्षापासून शोकापने विजयी झेंडा रवला आहे. परंतु, या निवडणुकीत शेकापचे यशस्वी आमदार गणपतराव यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना संधी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील सांगोला मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- दिलीप माने (शिवसेना), विष्णू यलमार (वंचित बहुजन अघाडी), जयवंत बगाडे (मनसे)

माळशिरस मतदारसंघ क्रमांक- 254

वियजसिंह मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला अशी ओळख असणारा माळशिरस मतदारसंघात राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिवंगत हनुमान जगन्नाथ डोळस यांनी सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. वियजसिंह मोहिते पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर हे गणित बदलून गेले. डोळस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून 2014 साली 77 हजार 179 मतांनी वियजी झाले होते. यावेळी अपक्ष अनंत खंडागळे यांचा 6 हजार 245 मत पडली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील माळशिरस मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- राम सातपुते (भाजप), उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी), राज यंशवंत कुमार (वंचित बहुजन अघाडी), मनीषा अप्पासाहेब करचे (मनसे)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.