Solapur: सोलापूरात एकाच कुटुंबातील चार मुले पोहण्यास गेली असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर भीमा नदीत ही चारही मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर लवंगी येथे राहणारे शिवाजी तानवडे हे नदीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ समीक्षा आणि अर्पिता आणि मेव्हण्याची मुले विठ्ठल आणि आरती हे सुद्धा नदीच्या येथे आले. त्यांना पाहता शिवाजी तनवडे यांनी त्यांना घरी जा असे सांगितले. मात्र या चारही मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते थोडे पाण्यात पुढे पोहण्यास गेले तेव्हा नदीत उतरले.
समीक्षा हिला पोहता येत होते पण अर्पिताला फारसे पोहता येत नव्हते. अन्य दोघेजण सुद्धा नदीच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरले. तर पोहताना समीक्षा हिने आरतीचा हात धरला होता आणि विठ्ठल याने अर्पिताला पकडले होते. पण नंतर हे चौघेजण बुडू लागल्यानंतर आवाज येऊ लागल्याने शिवाजी हे त्यांच्याजवळ त्यांचा वाचवण्यास गेले. तेव्हा त्यांनी समीक्षा आणि आरती त्यांना किनाऱ्याजवळ सोडले. नंतर विठ्ठल आणि अर्पिता यांना शिवाजी घेऊन येत असताना पाहिले. पण त्याचवेळी समीक्षा आणि आरती पाण्याचा प्रवाह खुप असल्याने पुन्हा बुडल्या. तसेच शिवाजी यांच्या कडेवरील विठ्ठल आणि अर्पिता हे दोघे सुद्धा निसटून पाण्यात बुडाले.(Mumbai: लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या, प्रियकर अटकेत)
ही दुर्घटना झाल्यानंतर शिवाजी यांचा धीर सुटला. मात्र शिवाजी यांना नदीतून बाहेर काढण्यासाठी शेवटी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. मृत झालेल्यांमध्ये समीक्षा ही 8 वी इयत्तेतील, अर्पिता आणि आरती 5 इयत्ता व विठ्ठल हा 5 वी इयत्तेत शिकत होता.