Mumbai: लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या, प्रियकर अटकेत
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

लग्नाला टाळटाळ करणाऱ्या प्रेयसीची तिच्या प्रियकराने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी मेट्रो स्टेशनखालील शौचालयात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर अंधेरी पोलिसांना याबाबत कळवण्यात आले होते. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात मृत तरूणी आणि एक तरूण एकत्र शौचालयात गेल्याचे दिसले. पण काही वेळाने तरुण एकटा बाहेर आला. तरुणी आली नाही म्हणून संबंधित पाहण्यास गेले तर हा प्रकार समोर आल्याची माहिती मिळत आहे.

नियाज (वय, 19) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. नियाज आणि मृत तरूणीमध्ये गेल्या अनेक प्रेमसंबं होते. यामुळे नियाज संबंधित तरूणीकडे वारंवार लग्नाची मागणी करत होता. परंतु, तरूणी टाळाटाळ करत होती. यामुळे त्यांच्यात सतत भांडण होत राहायचे. यातून नियाजने तिला ठार करण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने तिला अंधेरीला घेऊन आला. त्यानंतर दोघेही अंधेरी मेट्रो रेल्वेस्थानका खालील सिद्धेश्वर महिला संघ संचलित शौचालयात गेले. तिथे गेल्यानंतर नियाजने तरुणीवर हल्ला करायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांने दगडाने ठेचून तिची शौचालयातच हत्या केली आहे. हे देखील वाचा- Mumbai: गर्लफ्रेन्डसाठी केली वृद्ध महिलेची हत्या, प्रियकराने दिलेले कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

संबंधित तरूणीला ठार केल्यानंतर निजायने अधंरी रेल्वे स्थानकावर पळत गेला आणि विरारच्या दिशेने जाणारी लोकल पकडून फरार झाला. लोकलमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच नियाजने सर्व हकीकत सांगत हत्येची कबूली दिली. या घटनेनंतर अंधेरी चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.