प्रेयसीला पैसा पुरवण्यासाठी तिच्या प्रियकराने एका वृद्ध महिलेची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai) भांडुप (Bhandup) परिसरात 15 एप्रिल रोजी घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. परंतु, कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांनी महिनाभर चौकशी सुरू ठेवली. दरम्यान, ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हापासून या परिसरात राहणारा एक तरूण गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या प्रेयसीची चौकशी केली असता सर्व सत्य समोर आले आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, 15 एप्रिल रोजी भांडूप येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात केली. दरम्यान, परिसरात राहणाऱ्या अनेक संशियतांची पोलिसांनी कसून चौकशी केली. परंतु, कोणताही पुरावा नसल्याने आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याचदरम्यान, या परिसरात राहणारा एक तरूण ही घटना घडली, तेव्हापासून गायब असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्या तरूणाच्या प्रेयसीची चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. हे देखील वाचा-'माझ्याविरोधात दाखल केलेली तक्रार पूर्णतः खोटी'; भष्ट्राचाराच्या आरोपांवरुन अनिल परब यांचे ट्विटद्वारे स्पष्टीकरण
मिळालेल्या माहितीनुसार, इमरान मुन्ने मलिक (वय, 24) असे आरोपीचे नाव आहे. इमरान भांडुपच्या फुगेवाला कंपाउंड परिसरामध्ये राहतो. त्याचे या परिसरात राहणाऱ्या एका दिपाली राऊत हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. परंतु, ती नेहमी इमरानकडे पैशांची मागणी करत असे. यामुळे इमरानने तिला पैसे पुरवण्यासाठी याच परिसरात राहणाऱ्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा गळा चिरून हत्या केली. तसेच तिच्या घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल त्याने लंपास केला. प्रेयसीच्या मदतीने त्याने चोरी केलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावली. पण पोलिसांच्या कचाट्यातून ते वाचू् शकले नाहीत.