अलिबागमध्ये सापांच्या विषाची तस्करी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर या टोळीतील चार आरोपींना गुन्हे अन्वेष विभागीय अधिकाऱ्यांनी पकडण्यास यश आले आहे.
रायगडातील गुन्हे अन्वेषणाच्या विभागाला सापाच्या विषाची तस्करी करणारे दोन व्यक्ती गुजरातहून अलिबागमध्ये येणार असल्याची माहिती त्यांच्या गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्या दोन आरोपींना पकडण्यात आले आहे.तसेच या आरोपींकडे पावणेदोनशे कोटींचे विष मिळाले आहे.
या बाबतीत पोलिसात गुन्हा दाखल केला असता, पोलिसांना चौकशी दरम्यान अजून दोन व्यक्ती या तस्करीमध्ये सामील असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे या चारही आरोपींना न्यायलयाने 29 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.