राज्यातील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने राज्यातील झोपडपट्टी (Slum) धारकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबत माहिती दिली आहे. आव्हाड यांनी ट्विटरवरुन माहिती देताना म्हटले आहे की, ''यापुढे झोपडपट्टी निष्कासित केल्यानंतर 5 वर्षांनी झोपडीमालकाला ती झोपडी विकण्याचा अधिकार राहील. घर खरेदीदार व विक्री करणाऱ्यास SRA ची परवानगी घ्यावी लागेल''.
महाविकासाघाडी सरकारकडून ही दिवाळी भेट असल्याचे सांगित जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, 2011 नंतर बांधलेल्या घरांना पैसे भरून घरे देण्याचा कायदा आहे. ती किंमत यापुढे अडीच लाख इतकी असेल. तसेच, 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपडी धारकांना केवळ अडीच लाख रुपयांत पक्के घर बांधून मिळणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्वत: विकसित करणार- जितेंद्र आव्हाड)
ट्विट
शुभ दिपावली! pic.twitter.com/4JTQOomNQP
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 5, 2021
मुंबईच्या तमाम झोपडपट्टी वासियांना ही दिवाळी आनंदाची व सुख, समृद्धीची जावो अशा शुभेच्छाही आव्हाड यांनी दिल्या आहेत. दरम्यान, आज (5 नोव्हेंबर) दुपारी 12.30 वाजता जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. राज्य सरकारने झोपडपट्टी बाबत घेतलेल्या निर्णयाबाबत जितेंद्र आव्हाड या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्याची शक्यता आहे.