Skywalk sheds collapse | (Photo Credit: File Photo, Twitter)

मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाच्या अनास्थेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. वांद्रे पश्चिम (Bandra West) भागातील एसव्ही रोड येथील स्कायवॉकच्या (Skywalk) पत्र्याचे शेड खाली कोसळले. या घटनेत दोन महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी झालेल्या दोन्ही महिलांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परिसरात आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्कायवॉकला लावण्यात आलेली पत्र्याची शेड निखळून खाली पादचाऱ्यांच्या अंगावर पडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे केवळ एसव्ही रोड येथीलच नव्हे तर वांद्रे परिसरातील इतरही अनेक स्कायवॉक चिंताजनक स्थितीत आहेत. अनेक स्कायवॉक हे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. तर, काही स्कायवॉक डागडूजी न केल्याने धोकादायक बनले आहेत. त्यामुळे स्कायवॉकचा वापर करुन किंवा त्या खालून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्नाची सोडवणूक करावी अशी मागणी आता पुढे येत आहे.

ट्विट, पंकज अहुजा

दरम्यान, केवळ स्कायवॉकच नव्हे तर, शहरातील रस्त्यांलगत किंवा चौकालगत असलेली जाहिरातींची होर्डिंग हा सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा विषय ठरला आहे. मुंबई (Mumbai) परिसारातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या चर्चगेट रेल्वे स्टेशन (Churchgate railway station) परिसरात होर्डिंग कोसळून (Hoarding Collapse) एक जण ठार झाला. ही घटना मंगळवारी (12 एप्रिल 2019) दुपारी घडली. मधुकर नार्वेकर (वय 62) असे या घटनेत ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार हे होर्डिंग पश्चिम रेल्वे अंतर्गत येते. (हेही वाचा, मुंबई: चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळले; एक ठार)

एएनआय ट्विट

ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मधुकर नार्वेकर यांना जी टी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग नेमके कशामुळे कोसळले याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तपास सुरु केला आहे.