मुंबई: चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळले; एक ठार; दोन जखमी
Churchgate railway station | ( File Photo)

मुंबई (Mumbai) परिसारातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या चर्चगेट रेल्वे स्टेशन (Churchgate railway station) परिसरात होर्डिंग कोसळून (Hoarding Collapse) एक जण ठार झाला, तर दोघे जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मधुकर नार्वेकर (वय 62) असे या घटनेत ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार हे होर्डिंग पश्चिम रेल्वे अंतर्गत येते.

ही घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मधुकर नार्वेकर यांना जी टी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग नेमके कशामुळे कोसळले याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तपास सुरु केला आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, होर्डिंग कोसळून जीवीत हानी होण्याची घटना या आधी पुणे शरहात घडली होती. पुणे शहरातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ही घटना घडली होती. या चौकातील होर्डिंग हे अनधिकृत होते. या घटनेत दोघेजण ठार तर, आठजण गंभीर जखमी झाले होते. (हेही वाचा, पुणे: अनधिकृत होर्डिंग कोसळून २ ठार, ८ जखमी; परिसरात घबराटीचे वातावरण)

महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष तसेच, पालिकेच्या सूचनेला होर्डिंगबाजांनी दाखवलेली केराची टोपली याचा एकत्रीत परिणाम या दुर्घटनेच्या रुपाणे पुण्यात पाहायला मिळाला होता.. या घटनेत केवळ जीवीतच नव्हे तर, वित्तहानीही झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवरच हे होर्डिंग कोसळल्याने उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. ही घटना गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारच्या सुमारास घडली होती.