कौटुंबिक वादातून बहिणीच्या पतीची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ठाणे येथे (Thane) शनिवारी रात्री घडली. दारु पिऊन आल्यानंतर आपल्या बहिणीचा पती तिच्या चरित्राच्या संशय करतो. एवढेच नव्हे तर, या विषयांवरून बहिणीचा पती तिला मारहाणही करतो. या द्वेषातून पत्नीच्या भावाने त्याच्या मित्राच्या सहाय्याने बहणीच्या पतीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. शेजाऱ्यांनीच या घटनेची माहीती पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
सागर दास (२७) असे या मृताचे नाव असून तो ठाणे येथील काशिमीरा भागात राहायला होता. आपल्या पत्नीचे बाहेर प्रेमसंबध असल्याचे सागरच्या मनात संशय होता. या विषयावरुन सागर आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार वाद होत असे. याप्रकरणी तो आपल्या पत्नीला मारहाणही करायचा. शनिवारी रात्री सागर हा दारु पिऊन घरी आला, यावरुन त्यांच्यात भांडण झाले, यावेळी घरात असलेल्या पत्नीचा भाऊ राहुल यांनी आपल्या मित्रासह सागरला जोरदार दगडांनी हल्ला केला. या घटनेत सागरचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना शेजार्यांनी घटनेची माहिती दिली आणि पत्नीचा भाऊ आणि मित्राला अटक केली. राहुल आणि त्याच्या मित्रावर गुन्हा नोंदवून पोलिस पुढील तपास करत आहेत. हे देखील वाचा- आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या
गेल्या काही दिवसापूर्वी एका वृद्धाने आपल्या मुलाचे खून करुन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आपल्या मुलाचे याआधी लग्न झाले असूनही त्याने बाहेर प्रेमसंबध असलेल्या महिलेशी लग्न करुन तिला घरी आणले होते. यामुळे वडिलांनी झोपेत असलेल्या मुलाच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारा करत त्याचा खून केला, अशी माहिती नवी मुंबई येथील पोलिसांनी दिली आहे.