बेस्ट (BEST) गाड्यांच्या नामफलकांवर बदल करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे 'सायन' (Sion) चे 'शीव' (Shiv)असे बेस्टच्या नावफलकावर दिसणार आहे. तसेच ही कार्यवाही बेस्टकडून टप्याटप्याने करण्यात येणार आहे.
शासनाच्या व्यवहारात मराठी भाषेचा उपयोग करावा असे 7 मे 2018 च्या परिपत्रकामध्ये सांगितले गेले आहे. त्यामुळे 'सायन' हा इंग्रजी शब्दापेक्षा मराठी मूळ शब्द 'शीव' असा ठेवण्यात येण्यासाठी भाषा विभाग, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. तर बेस्ट ही कार्यवाही टप्याटप्याने करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सायन ऐवजी शीव असे बेस्टच्या नामफलकावर पाहायला मिळणार आहे.
शासकीय कार्यालयात लावण्यात आलेल्या पाट्या, फलक मराठीतून असावे. तसेच शासनाचा व्यवहार देवनागरी मराठी भाषेत असणे अनिवार्य असल्याचे महाराष्ट्र राजभाषा अभिनियमात नमूद करण्यात आले आहे.