Sion Flyover आजपासून  9  जानेवारी 2022 पर्यंत प्रत्येक विकेंडला राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
Sion flyover (Photo Credits: Facebook)

मुंबई ट्राफिक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) काल (15 ऑक्टोबर) दिलेल्या माहितीनुसार आता सायन फ्लायओव्हर (Sion Flyover) पुढील 3 महिने प्रत्येक विकेंडला डागडुजीच्या कामासाठी बंद राहणार आहे. हे डागडुजीचं काम Maharashtra State Roads Development Corporation कडून केले जाणार आहे. ट्राफिक पोलिसांकडून मोटार सायकलिस्ट साठी पर्यायी मार्ग दिले आहेत. 15 ऑक्टोबर ते 9 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळी पर्यंत फ्लायओव्हर बंद राहणार आहे. वाहनांसाठी शानिवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत फ्लायओव्हर बंद असणार आहे. नक्की वाचा: The Punishing Signal: मुंबई पोलीस म्हणतात 'हॉर्न नॉट ओके प्लिज! नाहीतर ट्रॅफिकमध्ये बसा बोंबलत'.

 कसे असतील पर्यायी मार्ग?

दक्षिण मुंबई मधून येणारी जड वाहनांची वाहतूक अरोरा जंक्शन कडून चोर लेन रोड वर उजवीकडे वळून वडाळा ब्रीज कडे जाईल. बरकत अली नाका, छत्रपती शिवाजी चौक, बरकत अली दर्गा रोड ( शिवडी चेंबूर लिंक रोड) भक्ती पार्क- वडाळा- आणिक डेपो रोड आणि अहुजा ब्रीज वरून आपल्या इच्छित स्थळी जाईल.

माझगाव रे रोड, काळाचौकी, चोर लेन रोड कडून येणारी अवजड वाहनं वडाळा ब्रीज खाली डाव्या बाजूचा टर्न घेऊन बरकत अली नाका, शांती नगर, भक्ती पार्क, आणिक डेपो, अहुजा ब्रीज कडे जाऊ शकतात. यामार्गाने पुढे नवी मुंबई, ठाणे कडे जाण्याचा मार्ग मोकळा असेल.

सायन हॉस्पिटल जंक्शन कडून येणारी वाहनं तेथेच डाव्या बाजूचा टर्न घेऊन सुलोचना शेट्टी मार्ग कडून माहिमच्या दिशेला जाऊ शकतात. अवजड वाहनं सायन सर्कल पासून लेफ्ट टर्न घेऊन रोड नंबर 6 आर एल केळकर मार्ग वरून पुढे जाऊ शकतात. देशपांडे चौक मधून लेफ्ट टर्न घेऊन सायन रेल्वे स्टेशनला जाऊन एलबीएस रोड, कुर्ला वेस्टला जाऊ शकतात.

माहिम, कुंभारवाडा कडून सायन हॉस्पिटल जंक्शन कडे येणारी अवजड वाहनं उजव्या बाजूचा टर्न घेऊन एमजी रोडला डाव्या बाजूचा टर्न घेऊन चोर लेन रोड आणि नंतर उजव्या बाजूचा टर्न घेऊन वडाळा ब्रीज वरून बरकत अली शांती नगर, भक्ती पार्क आणिक डेपो, अहुजा ब्रीज वरून जाऊ शकतात.