Mumbai: सायन उड्डाणपूल (Sion Flyover) आजपासून म्हणजेचं 27 मार्चपासून कमीतकमी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाहतुकीसाठी बंद राहील. हा उड्डाणपूल सोमवार ते शुक्रवार दरम्यान खुला राहील, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) दिली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (Maharashtra State Roads Development Corporation) सायन उड्डाणपुलाची दुरुस्ती करीत आहे. 27 मार्च ते 26 जून दरम्यान ही दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे या कालावधीत शनिवारी रात्री 10 वाजेपासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असेल, अशी माहिती वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. (वाचा - Lalbaug Flyover Closed for 3 Months: मुंबईतील लालबाग उड्डाणपूल आजपासून 15 जूनपर्यंत वाहतूकीसाठी बंद)
दक्षिण मुंबईला जाण्याची इच्छा असणारे लोक वडाळा-आणिक आरपीड - भक्ती पार्क-पूर्व फ्रीवे- सीएसएमटी / कुलाबा मार्गे जाऊ शकतात. तसेच ज्या वाहनधारकाला दादर, वरळी किंवा भायखळा येथे जायचे आहे ते वडाळा-आणिक रोड - भक्ती पार्क- वडाळा चार रस्त्यावरून - दादर पाच गार्डन मार्गे जाऊ शकतात.
दरम्यान, आठवड्याच्या शेवटी वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलिस रस्त्यावर तैनात केले जातील. सायन उड्डाणपूल आठवड्याच्या शेवटी बंद राहणार असल्याने मध्य मुंबईत गर्दी होण्याची शक्यता आहे.