महिला सबलीकरणासाठी झटणार्‍या हिरकणी रायडर्स सातारा च्या शुभांगी पवारचा अपघाती मृत्यू; नवरात्रीत साडेतीन शक्तीपीठ दर्शन मोहिमेदरम्यान ट्रकची धडक
शुभांगी पवार । PC: Facebook/ Udayanraje Bhosale

नवरात्री (Navratri) निमित्त साडेतीन शक्तीपीठांची दुचाकीवरून यात्रा करण्यासाठी बाहेर पडलेल्या (Hirkani Riders Satara) च्या शुभांगी पवारचा (Shubhangi Pawar) अपघाती मृत्यू झाला आहे. आज (12 ऑक्टोबर) सकाळी साडे नऊ - दहाच्या सुमारास त्यांना नांदेड अर्धापूर (Nanded Ardhapur) रस्त्यावरील भोकर फाट्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा अपघात झाला. यावेळी ट्रकने त्यांना धडक दिल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. Nanded Accident: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोठा अपघात; 37 जण जखमी, एकाचा जागीच मृत्यू.

ट्रक चालकाला अर्धापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान हिरकणी रायडर्स सातारा च्या शुभांगी पवार या महिला सबलीकरणासाठी अग्रेसर होत्या. नवरात्री दरम्यान काढलेल्या यात्रेत त्यांनी महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर बाबत जनजागृती करण्याबाबत तसेच रस्ते सुरक्षा बाबत जागृती करण्यासाठी पुढाकार घेतला होता. साडेतीन शक्तिपीठं म्हणजे अर्थात कोल्हापूरची महालक्ष्मी, माहुरची रेणूका माता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तश्रृंगी यांचा समावेश होता. कोल्हापूर, तुळजापूरच्या देवींचं दर्शन घेऊन महिलांचा ग्रुप नांदेडमार्गे माहुरला जात असताना हा अपघात झाला आहे.

Udayanraje Bhonsle यांची पोस्ट

शुभांगी पवारच्या अपघाताचं वृत्त समजताच खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. 42 वर्षीय शुभांगी यांच्या दुचाकीला ट्रकचा मागून धक्का बसला आणी या मध्ये त्यांच्या मेंदुला जबर धक्का बसला त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.