Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोठा अपघात (Road Accident) घडला आहे. ही घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड (Mukhed) तालुक्यात घडली आहे. या अपघातात एकूण 37 जण जखमी झाले आहेत. तर, एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडलाआहे, अशी माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

लातूरमधील उदगीर तालुक्यातील हाळी गावातील लग्नाचे वऱ्हाड बिलोली तालुक्यात जात होते. परंतु, नांडेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एका वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, 37 जण जखमी झाले आहेत. यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर 33 जणांवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Road Accident: अहमदनगर-मनमाड महामार्गावरील विळद घाटात भीषण अपघात; भरघाव कंटेनरच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात पूर्णा नदीवरून जाणाऱ्या औरंगाबाद– नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हिंगोलीकडे ऑक्सिजन घेऊन जाणारा एक टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला होता. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकर उलटल्यानंतर यामध्ये गॅस असल्याच्या अफवेने नागरिक व अन्य वाहनचालक घाबरले होते. परंतु वाहन चालकाने यात ऑक्सिजन असल्याची माहिती दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर, खोळंबलेली वाहतूक पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सुरळीत झाली.