दिवाकर रावते (Photo Credit : ANI)

1 सप्टेंबरपासून देशात मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) सुरु झाला आणि वाहन चालकांचे धाबे दणाणले. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीला होणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात या निर्णयाला तूर्त तरी स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक पत्रकार परिषद घेत य गोष्टीची घोषणा केली. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात वाहतुकीचे हे नवे नियम लागू नसणार नाही. राज्य सरकार जो पर्यंत अध्यादेश काढत नाही तोपर्यंत राज्यात हा कायदा लागू होणार नाही. असेही दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.

दिवाकर रावते यांनी केंद्रीय परिवहन मंत्री, नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे की, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘नवीन मोटार वाहन कायद्यानुसार दंडाच्या रकमेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तरी केंद्रीय सरकारने कायद्यात योग्य त्या दुरुस्ती करून निर्णयाबद्दल फेरविचार करून दंडाची रक्कम कमी करावी’. अशा प्रकारची विनंती दिवाकर रावते यांनी केल्याने तूर्त तरी केंद्राकडून ठोस निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. (हेही वाचा: गुजरात मध्ये वाहतुकीच्या दंडामध्ये कपात, अशाप्रकारे कोणत्याही राज्याला नियमात बदल करता येणार नाही- नितीन गडकरी)

दुसरीकडे, गुजरात सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करत दान्दाच्जी रक्कम 500 टक्क्यांनी कमी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला. सोबतच पश्चिम बंगालमध्येही ममता दिदींनी हा कायद्याचे पालन करण्यास नकार दिला आहे.