मुंबई: अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची केली हत्या; प्रियकरासह पत्नीला अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

अनैतिक प्रेमसंबंधात अडथळ ठरणाऱ्या पतीची आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील मालवणी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आरोपी महिलेने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या देऊन पतीची हत्या केली. तसेच हा नैसर्गिक मृत्यू आहे, असेही भासवण्याचे प्रयत्न केले. परंतु, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला संबंधित मृत्यू नैसर्गिक नसून हत्या करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. सुरुवातीला महिलेच्या प्रियकराला आणि एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. तसेच नैसर्गिक मृत्युचे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरचाही शोध घेतला जात आहे.

आरोपी महिलेने गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या पतीसह लग्न केले होते. परंतु, आरोपी महिलेचे घराबाहेर काही दिवसांपासून एका व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, यात आपला पतीचा अडथळा निर्माण होत असल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले. 20 फेब्रुवारी रोजी आरोपी महिलेने आपल्या पतीला जेवणातून झोपीच्या गोळी दिल्या. त्यानंतर आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून त्याची हत्या केली. तसेच आपल्या पतीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे तिने सर्वांनाच भासवले. एवढेच नव्हेतर, आपल्या पतीचे नैसर्गिक मृत्यू झाल्याचे बनावट प्रमाणपत्रही मिळवले होते. परंतु, संबंधित महिलेच्या पतीचे नैसर्गिक मृत्यू झाला असून त्याची आत्महत्या झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच नैसर्गिक मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टराचीही शोध घेतला जात आहे. हे देखील वाचा- कल्याण: 6 अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका शिक्षकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे इतर एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. यात तिच्या पतीचा अडथळा होता. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने तिने पतीची निर्घृण हत्या केली. यामध्ये एका रिक्षाचालकाचा आणि एका डॉक्टराचाही समावेश आहे. या प्रकरणात या दोघांचा हेतूही तपासला जात आहे. नैसर्गिक मृत्यूचं खोटे प्रमाणपत्र देणारा डॉक्टर अद्याप फरार आहे.