धक्कादायक! वडिलांनी 100 रुपये दिले नाही म्हणून मुलाची आत्महत्या
Hanging (Photo Credits: Representative Image)

शेतातील कामे केल्यानंतर आपल्या वडिलांनी 100 रुपये देण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोलापूर (Solapur) तालुक्यातील वडाळा (Wadala) येथे घडली. संबधित तरुण गेल्या चार-पाच दिवासांपासून बेपत्ता असल्यामुळे संपूर्ण कुटुंब त्यांचा शोध घेत होते. शुक्रवारी शेतात गेल्यानंतर एका गुराख्याला उग्र वास येत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी संबधित तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आले. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

विकास दत्तात्रेय माने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विकास याने गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी शेतातील सोयाबीन पिकाच्या 50 गोण्या मजूर न लावता स्वता उतरून घेतल्या होत्या. त्यावेळी विकासने त्याच्या वडिलांजवळ 100 रुपयांची मागणी केली होती. पंरतु, वडिलांनी नकार दिल्यानंतर वडिलांसोबत बाचाबाची करुन विकास घराबाहेर पडला. मात्र, दोन दिवस उलटून गेले तरीदेखील विकास घरी आला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी त्याच्या शोध घ्यायला सुरुवात केली. एवढेच नव्हेतर, त्याचा शोध लागत नसल्यामुळे कुटुंबियांनी समाज माध्यमांद्वारे विकास बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या छाया चित्रासह प्रसारीतही केली होती. दरम्यान, विकास याच्या नातेवाईकाच्या शेतात एका गुराख्याला उग्र वास येत असल्याचे समजले. त्यावेळी विकास याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळाले. मृतदेह पूर्णत: सडलेला असून कपड्यावरुन विकास याची ओळख पटली असल्याची महिती स्थानिक पोलिसांनी दिली. हे देखील वाचा- जालना: व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या ४ जणांना अटक

विकास माने याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात उत्पादन झालेल्या सोयाबीनच्या 50 गोणी विकास याने मजूर न लावता स्वत: उतरून घेतल्या होत्या. त्यामुळे स्वखर्चासाठी त्याने वडिलांना शंभर रुपये मागणी केली होती. त्यावेळी वडिलांनी ताबडतोब पैसे दिले नाहीत. त्यामुळे केवळ शंभर रुपये मागितले असता वडिलांनी दिले नाहीत याचा प्रचंड मन:स्ताप होऊन विकास हा वैफल्यग्रस्त झाला. एवढय़ाशा कारणावरून त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली.