विकृती! सख्ख्या बहिणीवर भावाचा 4 वर्षांपासून बलात्कार; मोठ्या बहिणीलाही बनवले वासनेचा बळी, आईवरही केली जबरदस्ती
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

झारखंडमधील (Jharkhand) लोहरदगा (Lohardaga) शहरी पोलीस स्टेशन परिसरात एका भावाने बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे. या तरुणाने आपल्याच घरात दोन सख्ख्या बहिणींना वासनेचे बळी (Rape) बनवले. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. महत्वाचे म्हणजे आरोपीने फक्त आपल्या बहिणींच्यावरच बलात्कार केला नाही तर, मुलींच्या मदतीसाठी आलेल्या आईवरही जबरदस्ती केली आहे.

मुलाच्या या कृत्याने हादरून गेलेल्या आईने मुलाविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक करून कारागृहात रवानगी केली. रिपोर्टनुसार, ही घटना लोहरदगा जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू आझाद बस्ती येथील आहे. आरोपी हा येथील रहिवासी आहे. तो एका गॅरेजमध्ये मोटार मेकॅनिक म्हणून काम करतो. त्याला घरात दोन बहिणी आहेत. मोठी बहीण 19 वर्षांची आहे, तर धाकटी 16 वर्षांची आहे. याशिवाय घरात आई वडीलही आहेत.

सुमारे 3-4 वर्षांपासून तो त्याच्या लहान बहिणीवर सतत बलात्कार करत होता. बुधवारी (27 एप्रिल 2022) मोठी बहीण आंघोळ करून स्वयंपाकघराकडे जात असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. घटनेदरम्यान मोठ्या बहिणीच्या किंकाळ्या ऐकून धाकटी बहीण खोलीत पोहोचली आणि आपल्या बहिणीला भावाच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र आरोपीने तिला चाकू दाखवून गप्प केले.

इतक्यात मुलींचा आवाज ऐकून त्यांची आईही तिथे पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की आरोपी पूर्णपणे नग्न अवस्थेत होता आणि तो त्याच्याच बहिणींसोबत अश्लील कृत्य करत होता. आईने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता मुलाने तिच्यावरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली. (हेही वाचा: बापाने फासला नात्याला काळीमा; जन्मदात्याने केला 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, वडिलांचे कृत्य पाहून भावाने केली पोलिसांत तक्रार)

यामुळे दुखावलेल्या आरोपीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाबाबत महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी जोसेफिना हेमब्रम यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 354, 506 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.